आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयत समन्वय २०२६ ला सुरूवात
आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयत समन्वय २०२६ ला सुरूवात
जळगाव- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आग्नेय बॅचतर्फे आयोजित समन्वय २०२६ सप्ताहांतर्गत आर्ट गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार साकारले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत समन्वय २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीने शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. अनिकेत पाटील, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच धन्वंतरी पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर्स उपस्थित होते. आर्ट गॅलरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इन्फाईनाइट हॉरीझन या थीमवर आधारीत कलाकृती सादर करण्यात आल्या. यात भविष्यातील जग, अश्मकालीन युग, ब्रम्हांड, पाण्याखालील जग, हम्पी संस्कृती, शालीमार बाग, मिनाक्ष मंदिर, रायगड किल्ला अशा विविध १० कलाकृती विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेखपणे साकारल्या होत्या. तसेच हार्दीक जैस्वाल या विद्यार्थ्याने स्व. गोदावरी आजींचे तयार केलेल्या पोट्रेट डॉ. उल्हास पाटील यांना भेट म्हणून देण्यात आले. यावेळी न्युरोसर्जरी तज्ज्ञ डॉ. अनिकेत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी समन्वय २०२६ चे ट्रेलर स्क्रीनवर दाखविण्यात आले. तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्याच्या या कलाकृतीचे कौतुक केले. सूत्रसंचालन अमित पाटील, आस्था भागवत यांनी केले. यशस्वीतेसाठी वेदांत दाते, उन्नती खरोडे, हार्दिक जैस्वाल, शुभदा तोडकर, ऋत्वीक भुजबळ, मुस्कान सिद्दीकी यांनी परिश्रम घेतले. १३ एप्रिल रोजी प्रॉम्प नाईटचा कार्यक्रम घेण्यात आला. दि. १४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत