गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
लेवाजगत न्यूज जळगाव: गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातीलगिट आणि गिटहब कोडिंग क्लब’ तर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रत्यक्ष प्रयोगाधारित कार्यशाळेचे आयोजन ११ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना रॅपिड प्रोटोटायपिंग, गिट आणि गिटहब यांसारख्या उद्योगाभिमुख विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात ’ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंग’ या संकल्पनांपासून सत्राची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांने पायथन भाषेतील ‘खाते’ प्रकल्पाचे प्रत्यक्ष विश्लेषण केले.गिटहब प्रशिक्षण: कॉम्प्युटर सेंटरमधील प्रात्यक्षिक सत्रात प्रतिक वारके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःचे डेव्हलपर प्रोफाइल तयार करणे आणि कोड रिपॉझिटरी व्यवस्थापित करण्याचे कौशल्य आत्मसात केले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण करत आपल्यातील आत्मविश्वासाचे दर्शन घडवले.या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे विशेष सहकार्य व प्रोत्साहन लाभले. तांत्रिक कौशल्य आणि भविष्यातील रोजगार संधींच्या दृष्टीने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.हा उपक्रम प्रा. निलेश वाणी (विभाग प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली कोडिंग क्लबचे विद्यार्थी, प्रा. कल्पेश वाणी व प्रा. राजनंदिनी यांनी यशस्वीरित्या राबविला.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत