Contact Banner

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; 72 तासांत विमा दावा नोंदवण्याचे मंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन

 

avkali-paus-pikanche-mothe-nuksan-72-tasat-vima-dava-nondavnyache-mantri-raksha-khadse-avahan

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; 72 तासांत विमा दावा नोंदवण्याचे मंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन

लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर दि. 2 एप्रिल 2026 :- जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून प्रशासन सतर्क झाले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महत्वाचे आवाहन केले आहे. प्रधानमंत्री फळ पीक बीमा योजना (PMFBY) अंतर्गत पीक विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीकडे नोंदवावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेळेत नुकसान नोंदवल्यास विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ व जलद होईल, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने अधिकृत टोल-फ्री क्रमांक 14447 तसेच PMFBY WhatsApp Chatbot क्रमांक 7065514447 उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून शेतकरी आपली तक्रार व नुकसानीची माहिती सहजपणे नोंदवू शकतात.

शेतकऱ्यांनी विलंब न करता त्वरित विमा दावा दाखल करावा, असे आवाहन करताना मंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासनही मदतीसाठी तत्पर असल्याचे नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.