पॅलेटाईन (शिकागो) येथील स्वामीनारायण मंदिरात हनुमान प्रागट्य उत्सव उत्साहात; समूह पूजा व बजरंग बाण कथा आयोजन
पॅलेटाईन (शिकागो) येथील स्वामीनारायण मंदिरात हनुमान प्रागट्य उत्सव उत्साहात; समूह पूजा व बजरंग बाण कथा आयोजन
लेवाजगत न्यूज पॅलेटिन-अमेरिकेतील पॅलेटाईन (शिकागो) येथे असलेल्या वडतालधाम अंतर्गत येणारे श्री स्वामिनारायण मंदिर येथे चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री हनुमानजींचा प्रागट्य उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी सकाळपासूनच गुजराती, मराठी, तामिळ, कर्नाटक तसेच उत्तर भारतीय भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. भक्तांनी हनुमानजींना तेल व नारळ अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
सायंकाळी भव्य समूह हनुमान प्रागट्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांनी विधिवत समूह हनुमान पूजा संपन्न केली. या पूजेमध्ये ५० हून अधिक भक्तांनी एकत्र सहभागी होत आध्यात्मिक लाभ घेतला. वडतालधाम परिवारातील भक्तांनी या पूजेद्वारे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी व शास्त्री मुक्तप्रकाशदासजी तसेच संपूर्ण सत्संग समाजाचे मोलाचे योगदान लाभले. कमलेशभाई शाह, कनुदादा, उमेशभाई, अश्विनभाई, घनश्यामभाई, रिंकुभाई यांनी मुख्य यजमान म्हणून सेवा दिली.
यजमानांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या शनिवार व रविवारी या निमित्ताने पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांच्या श्रीमुखातून ‘बजरंग बाण’ या दिव्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संगीतबद्ध सुंदरकांडाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी सुभाषभाई (लहान व मोठे), स्नेहलभाई, धरमभाई, शरदभाई, शिरीषभाई, भरतभाई, प्रदीपभाई, धीरुबापा, चेतनभाई, समीरभाई, सुरेंद्रभाई, किरीटदादा, दीपकभाई, नटुदादा, केयुरभाई इत्यादी वरिष्ठ भक्तांसह अनेक भाविकांची उपस्थिती लाभली.
Hanuman Manifestation Festival Celebrated with Devotion at Swaminarayan Temple in Palatine (Chicago); Group Puja and Bajrang Baan Katha आयोजित
Levajagat News, Palatine (USA)
The Hanuman Manifestation Festival was celebrated with great enthusiasm and devotion at the Shree Swaminarayan Temple (Vadtaldham) located in Palatine (Chicago), USA, on the auspicious occasion of Chaitra Purnima. On Thursday, April 2, 2026, devotees from Gujarati, Marathi, Tamil, Kannada, and North Indian communities gathered in large numbers from early morning to seek darshan. Devotees expressed their श्रद्धा by offering oil and coconuts to Lord Hanuman.
In the evening, a grand group celebration of the Hanuman Manifestation Festival was organized. On this occasion, Pujya Shastri Dharmaprakashdasji performed the group Hanuman puja विधिवत. More than 50 devotees participated collectively in the puja and received spiritual benefits. Devotees from the Vadtaldham community also offered prayers for world peace.
The successful आयोजन of the festival was made possible through the valuable contributions of Pujya Shastri Dharmaprakashdasji, Shastri Muktaprakashdasji, and the entire satsang community. Kamleshbhai Shah, Kanudada, Umeshbhai, Ashwinbhai, Ghanshyambhai, and Rinkubhai served as the main hosts (yajmans).
According to the hosts, a divine discourse on “Bajrang Baan” will be delivered by Pujya Shastri Dharmaprakashdasji over the coming weekend (Saturday and Sunday). Additionally, a musical rendition of Sundarkand has also been organized.
Senior devotees including Subhashbhai (both younger and elder), Snehalbhai, Dharmabhai, Sharadbhai, Shirishbhai, Bharatbhai, Pradeepbhai, Dhirubapa, Chetanbhai, Sameerbhai, Surendrabhai, Kiritdada, Deepakbhai, Natudada, and Keyurbhai, along with many others, were present on the occasion.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत