भुसावळ येथे नव्या अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत
भुसावळ येथे नव्या अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत
लेवाजगत न्यूज भुसावळ : बनारस–पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस तसेच अयोध्या कॅन्ट–मुंबई (एलटीटी) अमृत भारत एक्सप्रेस या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी या दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर 29 एप्रिल रोजी दुपारी 12:15 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत करत प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.
या नव्या रेल्वे सेवेमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना बनारस आणि अयोध्या येथे जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाली असून भाविक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमास भुसावळ येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत