Contact Banner

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

basic-research-methodology-3-divasiya-karyashala-dr-ulhas-patil-college-of-physiotherapy-jalgaon-upakram


बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ७ एप्रिल २०२६ : गोदावरी फाउंडेशन अंतर्गत व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे  करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. चित्रा मृधा, डॉ. अनुराग मेहता, डॉ. आशीष पाटील आणि डॉ. प्रज्ञा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ. योगिता बावसकर (सहाय्यक प्राध्यापक, शासकिय महाविद्यालय जळगाव), डॉ. सचिन नरवडे (सहाय्यक प्राध्यापक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव), डॉ. मिलिंद कांबळे (सहप्राध्यापक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव) आणि डॉ. किरण मेंधे (सहप्राध्यापक, व्हीएसपीएम फिजिओथेरपी महाविद्यालय, नागपूर) इ मान्यवर उपस्थीत होते. या कार्यशाळेत संशोधनाची मूलभूत तत्त्वे, डेटा संकलन पद्धती, सांख्यिकीय विश्लेषण तसेच वैज्ञानिक लेखन या विषयांवर सखोल मार्गदर्शन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.