Contact Banner

लहान वाघोदा येथे हत्तीरोग नियंत्रणासाठी संक्रमण पडताळणी सर्वेक्षण यशस्वी

 

lahan-waghoda-yethe-hattirog-niyantran-sansarg-padatalni-sarvekshan-yashasvi

लहान वाघोदा येथे हत्तीरोग नियंत्रणासाठी संक्रमण पडताळणी सर्वेक्षण यशस्वी

लेवाजगत न्यूज वाघोदा खुर्द- रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत “हत्तीरोग दूरीकरण मोहीम 2027” च्या पार्श्वभूमीवर पोस्ट व्हॅलिडेशन सर्व्हेलन्स (संक्रमण पडताळणी सर्वेक्षण) यशस्वीरित्या पार पडले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या सर्वेक्षणासाठी गावाची निवड करण्यात आली होती.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या आदेशानुसार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भंगाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तडवी आणि आरोग्य हिवताप अधिकारी विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 10 ते 12 या वेळेत हे सर्वेक्षण राबविण्यात आले.

या मोहिमेची सुरुवात गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली चौधरी यांच्या रक्त नमुन्याने करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र थोरगव्हाण येथील आरोग्य पथकाने गावातील 50 नागरिकांचे रात्र रक्त नमुने संकलित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले.

यावेळी आरोग्य निरीक्षक डॉ. किशोर महाजन यांनी हत्तीरोग दूरीकरण मोहीम 2027 संदर्भात सविस्तर माहिती देत सर्वेक्षणाचे नियोजन स्पष्ट केले. पथकाने घरोघरी भेटी देत कीटकजन्य आजारांबाबत जनजागृतीही केली.

या उपक्रमात सरपंच सौ. दिपाली चौधरी, उपसरपंच सौ. वंदना कोलते, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चौधरी, सत्तार पटेल, सौ. पूजा कोलते, फातमा तडवी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत पाटील, कर्मचारी रवींद्र कोळी, वैभव चौधरी, अंगणवाडी सेविका प्रतिभा चौधरी, रेखा बाऊस्कर, मदतनीस भारती झोपे, वैशाली कोळी तसेच इतर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक किशोर महाजन, आरोग्य सेवक सुरेश तायडे, रुपेश ठाकरे तसेच आशा स्वयंसेविका मनीषा कोळी आणि मनीषा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

एकंदरीत, वाघोदा खुर्द येथे राबविण्यात आलेले हे सर्वेक्षण हत्तीरोग नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरले असून ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.