भोंदू खारातला एकनाथ शिंदेचे १७, तर मंत्री शेलार-पाटील यांचे ९ कॉल होते; तपासावरून राजकारण तापले
भोंदू खारातला एकनाथ शिंदेचे १७, तर मंत्री शेलार-पाटील यांचे ९ कॉल होते; तपासावरून राजकारण तापले
वृत्तसंस्था मुंबई-नाशिक-धुळे परिसरात गाजत असलेल्या भोंदू खरात प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत असून, या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला अधिकच वळण मिळाले आहे.
दमानिया यांनी दावा केला आहे की, आरोपी भोंदू खरात याच्याशी संबंधित कॉल रेकॉर्डमध्ये उपमुख्यमंत्री यांचे तब्बल १७ कॉल आढळले आहेत. तसेच भाजपचे मंत्री आणि यांचे प्रत्येकी ९ कॉल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या कॉल्सचा नेमका आशय काय होता, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
दमानिया यांनी यासोबतच कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करताना म्हटले की, संबंधित व्यक्तींनी या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका बजावली, हे तपासातून स्पष्ट व्हावे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या आरोपांवर राज्याचे मंत्री आणि यांनी प्रतिक्रिया देत, दमानिया यांनी सादर केलेले पुरावे संबंधित तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे सांगितले आहे. “पुरावे असल्यास ते अधिकृत संस्थांकडे सादर करावेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे कॉल रेकॉर्ड उघड करणे बेकायदेशीर ठरू शकते आणि संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, भोंदू खारात प्रकरणातील तपास सुरू असून, संबंधित ठिकाणी पोलिसांनी चौकशी वेगाने सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत