जेएनपीएच्या चौथ्या बंदराकडे जाणाऱ्या ६८ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलाचा भाग ८-१० महिन्यांतच खचला : वाहतुक बंद: तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
जेएनपीएच्या चौथ्या बंदराकडे जाणाऱ्या ६८ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलाचा भाग ८-१० महिन्यांतच खचला : वाहतुक बंद: तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
सुनिल ठाकूर उरण : जेएनपीएच्या बीएमसीटी या चौथ्या बंदराशी जोडणारा ६८ कोटी रुपये खर्च करून ८-१० महिन्यांपूर्वी वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला उड्डाणपूल अचानक खचल्याने खळबळ माजली आहे.कंटेनर वाहतूकीसाठी धोकादायक ठरत असल्याने बंद करण्यात आला आहे.
जेएनपीए अंतर्गत सिंगापूर पोर्ट (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल ) हे खासगीकरणाच्या माध्यमातून सर्वात मोठ्या लांबीचे चौथे बंदर उभारण्यात आले आहे. सुमारे १३ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या हे
बंदर कार्यान्वितही झाले आहे.या बंदरातुन वर्षाकाठी ५० लाख कंटेनर मालाची वाहतूक केली जाणार आहे.चौथ्या बंदराशी जोडणाऱ्या या ६८ कोटी खर्चाच्या व ७०० मीटर लांबीच्या दुपदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम जेएनपीएने एनएचएआय
कंपनीकडे सोपविण्यात आले होते.हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला होता.मात्र जसखार रत्नेश्वरी मंदिराच्या बाजुनेच जाणारा उड्डाणपूलाचा काही भाग तडा जाऊन खचला आहे.
८-१० महिन्यांपूर्वीच खुला करण्यात आलेला उड्डाणपूलाचा भाग खचल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील कंटेनर वाहतूक बंदर करण्यात आली आहे.दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.तर उड्डाणपुलावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असल्याचे न्हावा -शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत