Contact Banner

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ‘मोस्ट वॉन्टेड’ चेन स्नॅचर सादिक अली जेरबंद

bhusawal-bazarpeth-police-arrested-most-wanted-chain-snatcher-sadiq-ali-atank-irani


भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ‘मोस्ट वॉन्टेड’ चेन स्नॅचर सादिक अली जेरबंद

भुसावळ लेवाजगत न्यूज प्रतिनिधी फिरोज खान-भुसावळ शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी (रा. माहिती उपलब्ध नाही) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो अनेक पोलीस ठाण्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून घोषित करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने (डी.बी. पथक) नियोजनपूर्वक सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो दीर्घकाळापासून फरार होता.

तपासादरम्यान उघडकीस आले की, आरोपी सादिक अली याने राज्यातील विविध भागांमध्ये चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर व ग्रामीण भागांसह वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर या जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल असून तो फरार होता.

सदर कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर व जीवन कपडे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग नोंदवला.

या अटकेमुळे राज्यातील विविध भागांतील चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा असून, पोलीस त्याच्याकडून सखोल चौकशी करत आहेत.

दरम्यान, या धडाकेबाज कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी डी.बी. पथकाचे कौतुक केले असून, शहरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.