Contact Banner

गुरुवारी भुसावळ–वर्धा मेमूच्या चार गाड्या रद्द; पारस–अकोला दरम्यान ब्लॉकमुळे बदल

bhusawal-wardha-memu-4-trains-cancelled-paras-akola-block-railway-changes-thursday


गुरुवारी भुसावळ–वर्धा मेमूच्या चार गाड्या रद्द; पारस–अकोला दरम्यान ब्लॉकमुळे बदल

भुसावळ (प्रतिनिधी) :
भुसावळ विभागात रेल्वेच्या देखभाल आणि सुरक्षा कामांसाठी गुरुवारी (दि. २२) पारस–गायगाव–अकोला दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ‘ऑटोमॅटिक ब्लॉक सिस्टीम’च्या कामासाठी विशेष नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कामामुळे भुसावळ–वर्धा आणि भुसावळ–बडनेरा या मार्गावरील एकूण चार मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार —

  • भुसावळ–वर्धा मेमू (गाडी क्र. 11122, 11112)
  • भुसावळ–बडनेरा मेमू (गाडी क्र. 69102, 69109)

या गाड्या रद्द राहणार आहेत.

याशिवाय, ब्लॉकमुळे काही महत्त्वाच्या गाड्या उशिराने धावणार आहेत :

  • ओखा–पुरी एक्सप्रेस (शेगाव–नागरी दरम्यान सुमारे 2 तास 25 मिनिटे उशीर)
  • गोंदिया–कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (सुमारे 2 तास 10 मिनिटे उशीर)
  • नांदेड–श्री गंगानगर एक्सप्रेस (सुमारे 2 तास थांबवून ठेवली जाईल)

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि रेल्वे सुरक्षा वाढवणे या उद्देशाने हा ब्लॉक अत्यावश्यक आहे. मात्र, यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.