विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना ‘लेवा साहित्यिक रत्न’ पुस्तक सप्रेम भेट
विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना ‘लेवा साहित्यिक रत्न’ पुस्तक सप्रेम भेट
लेवाजगत न्यूज मुंबई दादर (पूर्व) :- येथील वसंत स्मृती, दादासाहेब फाळके मार्ग येथे मा. श्री. रवींद्र साठे (सभापती, खादी व ग्रामोद्योग मंडळ तथा राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) लिखित ‘राष्ट्रभाव’ या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष आ. राहुल नार्वेकर यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा सन्माननीय योग खेमचंद पाटील यांना लाभला. यावेळी खेमचंद पाटील यांनी स्वतः लिखित ‘लेवा साहित्यिक रत्न’ हे पुस्तक राहुलजी नार्वेकर यांना सप्रेम भेट देत साहित्यिक कार्याचा गौरवपूर्ण क्षण अनुभवला.
साहित्य, संस्कार आणि राष्ट्रभावनेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांच्या मनात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. खेमचंद पाटील यांनी राहुलजी नार्वेकर यांना पुस्तक भेट दिल्याने लेवा समाजाच्या साहित्य परंपरेचा गौरव वाढल्याची भावना राहुलजी नार्वेकर यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत