उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
लेवाजगत न्यूज कल्याण :(प्रतिनिधी:सुनिल इंगळे )उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे खान्देश भूषण, खान्देश रत्न आणि खान्देशश्री पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 दरम्यान प्रदान करण्यात येणार आहेत.यावर्षीचा खान्देश भूषण पुरस्कार प्रसिद्ध एकपात्री अहिराणी नाटक “आयात पोयत सख्यान” चे निर्माते, दिग्दर्शक व लेखक श्री. प्रविण माळी यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कलात्मक योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.तसेच खान्देश उद्योग रत्न पुरस्कार नामांकित बांधकाम व्यावसायिक श्री. सुनील चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा गौरव मिळणार आहे.प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल खान्देशश्री पुरस्कार श्री.प्रदीप अहिरे, श्री.राहुल गांगुर्डे आणि डॉ. कमलकांत वडेलकर यांना जाहीर करण्यात आला आहे.तर कला क्षेत्रात कु. श्रद्धा महिरे आणि गायन क्षेत्रात श्री.पी.गणेश यांना देखील खान्देशश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावर्षीचा ग्लोबल खान्देश महोत्सव दिनांक 22 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान उत्साहात पार पडणार असून, या कालावधीत आयोजित विशेष समारंभात सर्व मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.खान्देशच्या सांस्कृतिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून,या पुरस्कारांमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत