. डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजमध्ये ‘जागतिक पुस्तक दिन’ उत्साहात साजरा
.
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजमध्ये ‘जागतिक पुस्तक दिन’ उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज जळगांव -डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात आज उत्साहपूर्ण वातावरणात पुस्तक दिन साजरा करण्यात ला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. कविता शितल कुमार देशमुख यांच्या हस्ते महान ग्रंथपाल डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कविता राहुल भोरटके यांनी विद्यार्थिनींना जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यांनी वाचनाची सवय कशी व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरते, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी वर्षभरात सर्वाधिक पुस्तक वाचन करणाऱ्या तृतीय वर्ष बीएस्सीच्या विद्यार्थिनी दिशा जैन हिचा ग्रंथालयातर्फे पेन व पुस्तक देऊन विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मीनल राणे, एनएसएस को-ऑर्डिनेटर प्रो. जयश्री कुलकर्णी, प्रो. हिमानी जमाले तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत