Contact Banner

डॉ. विणा चौधरी यांना ‘कल्याणी आदर्श महिला पुरस्कार’; उत्साहात सोहळा संपन्न

 

dr-veena-chaudhari-kalyani-adarsh-mahila-puraskar-ceremony-concluded


डॉ. विणा चौधरी यांना ‘कल्याणी आदर्श महिला पुरस्कार’; उत्साहात सोहळा संपन्न


लेवा जगत प्रतिनिधी / खेमचंद पाटील, मुंबई

              कल्याण, दि. १८ एप्रिल २०२६ : शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक डॉ. सौ. विणा सुधाकर चौधरी यांना ‘कल्याणी आदर्श महिला पुरस्कार 2026’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालक मंदिर सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरवपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण डोंबिवली शहराच्या महापौर सौ. हर्षाली चौधरी या होत्या. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. गद्रे व अॅडव्होकेट सौ. संपदा कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. चौधरी यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व पुरस्कार प्रदान करण्यात आला.

           शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून समाजोपयोगी योगदानाबद्दल डॉ. चौधरी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी या यशामागे कुटुंबातील सर्व सदस्यांचा मोलाचा सहभाग, सातत्यपूर्ण पाठिंबा आणि प्रेरणा असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त केली. कुटुंबाच्या सहकार्यामुळेच हा सन्मान प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

              उत्कृष्ट नियोजन, मान्यवरांची उपस्थिती आणि आनंददायी वातावरणामुळे हा पुरस्कार सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला. उपस्थितांनी डॉ. चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.