Contact Banner

चैत्र पौर्णिमेनिमित्त सावद्यात मरीमाता यात्रा व हनुमान जयंती उत्सव

chaitra-pournima-savdyat-marimata-yatra-hanuman-jayanti-utsav


चैत्र पौर्णिमेनिमित्त सावद्यात मरीमाता यात्रा व हनुमान जयंती उत्सव

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – दि. २ एप्रिल रोजी गुरुवार, चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त सावदा शहरात मरीमातेच्या बारा गाड्यांची यात्रा मोठ्या उत्साहात निघणार असून, त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी हनुमान जयंती उत्सवही भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे.

देवीच्या बारा गाड्या संध्याकाळी मस्कावद रोडवरील मंदिरासमोरील रस्त्यावरून गणेश चौधरी (भगत) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह ओढणार आहेत.

सावदा शहरातील मोठा मारुती, लहान मारुती(पाटीलपुरा), सोमेश्वर नगर, सुगंगा नगर, निमजाई माता नगर, लक्ष्मीनारायण नगर, ओम कॉलनी, क्रांती चौक तसेच टेलिफोन ऑफिससमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात हनुमान जयंतीनिमित्त पहाटेपासून अभिषेक व पूजनाचे कार्यक्रम होणार आहेत.

तसेच, सावदा येथील पुरातन श्री स्वामीनारायण मंदिरात सकाळी ८ ते १० या वेळेत अभिषेक पूजन होणार असून, सकाळी १० वाजता आरती केली जाणार आहे.

एकूणच, मरीमाता यात्रा व हनुमान जयंती निमित्त सावदा शहरात सर्वत्र भक्तिमय व उत्साही वातावरण पाहायला मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.