दिघोडे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न
दिघोडे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न
उरण : सुनिल ठाकूर दि. 17 एप्रिल 2006 -रोजी मौजे दिघोडे ता उरण येथे महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. सदर शिबीरात दिघोडे व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.
या शिबीर प्रसंगी
उपस्थित नागरिकांना उरण तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी महाराष्ट्र शासनाच्चा विविध योजनांचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे अवाहन केले. पाणंद रस्ता,जिवंत 7/12, SIR, जणगणना, या बाबतीत जनतेला सविस्तर अवगत केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.
या शिबिरात शेतकऱ्यांना त्यांचे दुरुस्त केलेले 7/12, फेरफार उतारे, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रीमियर दाखले, रेशन कार्ड, संजय गांधी लाभार्थी, मिळालेल्या लाभाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
शिबीरात नवीन संजय लाभार्थी अर्ज 15 स्वीकारले; नवीन उत्पल दाखले अर्ज 44 स्विकारले, रेशन कार्ड अर्ज प्रत्यक्षात जागेवरच दुरुस्ती देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत 15% निधीमधून
बाबासाहेब आंबेडकर नगर दिघोडे मधील 15 लाभार्थी यांना सौर पॅनल चे वाटप करव्यान आहे'
सदर शिबीर प्रसंगी जि.प.सदस्य डॉ.मनिष पाटील , उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम,गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ,सहायक कृषी अधिकारी विभावरी चव्हाण,महसूल नायब तहसीलदार रविंद्र सानप,सरपंच कीर्तीनिधी ठाकूर,
मंडळ अधिकारी मनिष जोशी, मंडळातील ग्राम महसूल अधिकारी अमित दुलगज , सत्यवान पाटील निहालसिंग जसवाल ग्रापंचायत सदस्य,ग्रामसेविका, कर्मचारी आदी सह परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते -शिबिराचे आयोजन दिघोडे ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी सुंदर रित्या पार पाडले.
कार्यक्रमाचे शानदार निवेदन रायगड भूषण नितेश पंडित यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत