डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
लेवाजगत न्यूज जळगाव :-गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी यांची १३५ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच भारतीय संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदानावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी श्रद्धाभावाने बुद्ध वंदना सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत