Contact Banner

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय 2026 स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

dr-ulhas-patil-vaidkiya-mahavidyalayat-samanvay-2026-snehasammelan-prarambh


डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय 2026 स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ 

लेवाजगत न्यूज जळगाव -  डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात आजपासून समन्वय स्नेहसंमेलनाचा प्रारंभ आर्ट गॅलरीतून होत असून  येत्या सात दिवसात विविध स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी समन्वयमधून बघायला मिळणार आहे.

भावी वैद्यकिय तज्ञांचा कलाविष्कार अर्थात समन्वयचा प्रारंभ डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,  डॉ. माया आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, यांच्या उपस्थीतीत होणार आहे.  

समन्वय स्नेहसंमेलनात सोमवार दि १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीचे उदघाटन, १३ रोजी प्रश्नमंजूषा, प्रोम नाईट, होम बॅण्ड  दि १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,टॅलेन्ट शो १५ रोजी फॅशन शो,१६ रोजी जेआर नाईट,१७ रोजी डी.जे.नाईट तर १८ एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.