फैजपूर येथे काँग्रेसचे “संघटन सृजन अभियान” मेळावा उत्साहात पार
फैजपूर येथे काँग्रेसचे “संघटन सृजन अभियान” मेळावा उत्साहात पार
फैजपूर (लेवाजगत न्यूज) : पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत फैजपूर येथे महत्त्वपूर्ण मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा काँग्रेस कमिटीपासून ग्राम स्तरापर्यंत पक्ष संघटन अधिक सक्षम, सुसंघटित आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या मेळाव्यात काँग्रेस पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. संघटनात्मक बळकटीकरण, नव्या नेतृत्वाला संधी, तसेच पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या भावना, अपेक्षा व सूचनांचा सकारात्मक विचार करून पुढील कार्याचा आराखडा निश्चित करण्यात आला.
राज्यभर सुरू असलेल्या या अभियानामुळे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेला नवी ऊर्जा मिळत असून जिल्हा ते ग्राम स्तरावर पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर पक्ष अधिक प्रभावीपणे आवाज उठवेल, असेही नमूद करण्यात आले.
या प्रसंगी AICC निरीक्षक मा. श्री. प्रमोद कुमारजी, जळगाव जिल्ह्याचे वरिष्ठ निरीक्षक आमदार श्री. साजिद पठाण, मा. श्री. आरिज मिर्झा, मा. श्री. अरविंद कोलते, जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप पवार, माजी आमदार श्री. शिरीष चौधरी, माजी आमदार श्री. रमेश चौधरी यांच्यासह रावेर-यावल मतदारसंघातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमातून “संघटन मजबूत – काँग्रेस मजबूत” हा संदेश देत पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत