कागदपत्रांची हेराफेरी करून वाटाणा आणि कलिंगडांच्या बियांची तस्करी, शासनाचे फसवणूक, डी आर आय ने केली कारवाई
कागदपत्रांची हेराफेरी करून वाटाणा आणि कलिंगडांच्या बियांची तस्करी, शासनाचे फसवणूक, डी आर आय ने केली कारवाई
उरण : सुनिल ठाकूर -जेएनपीए बंदरातून बनावट कागदपत्रांच्या आधारे तूरडाळ असल्याचे दाखवून वटाणा आणि कलिंगडाच्या बीयांची तस्करी करण्यात आलेल्या आयात दारावर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई करीत १३९ कोटी रुपयाचा माल जप्त केला असल्याची माहिती मिळत आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाला नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी बंदरात शासनाकडून प्रतिबंधित असणाऱ्या पिवळा आणि हिरवा वटाणा बेकायदेशीर आयात होत असल्याची माहिती मिळाली या मिळालेल्या माहितीनुसार विरोधात मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत १३२ कंटेनरची तपासणी केली असता, त्यात २७१० मेट्रिक टन कलिंगडाच्या बिया तंजानिया आणि सुदानमधून आणि ३१९ मेट्रिक टन हिरवा वटाणा कॅनडातूनआल्याचे आढळून आले आहे. या जप्त केलेल्या मालाची साधारण पणे १३९ कोटी रुपये किमंत असल्याचे समजले आहे.
भारत सरकारने देशी शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी हिरवा आणि पिवळा वटाणाच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. हे केवळ कोलकाता बंदराद्वारे आणि ठराविक किमान आयात किमतीवर आयात केले जाऊ शकतात, मात्र यावर प्रतिबंध असताना ही जेएनपीए मार्गे आणले जात होते.ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट द्वारे दुबई आणि इतर देशांतून पाकिस्तानी बनावटीच्या किंवा प्रतिबंधित वस्तूंची चुकीच्या नावाने होणारी आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने ही विशेष मोहीम राबवली आहे.
यामध्ये ही मोठी कारवाई केली आहे या आगोदर ही २०२१ मध्ये जेएनपीए बंदरात बांबू बीन्स म्हणून चुकीची माहिती देऊन आणलेला २०० कोटींचा वटाणा जप्त केला होता. या अशा प्रकारच्या अनेक तस्करीच्या घटना घडत असल्याने जेएनपीए बंदर हे तस्करीचे माहेर घर असल्याचे सिद्ध होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत