भारत–ऑस्ट्रिया द्विपक्षीय शिखर परिषद संपन्न; संरक्षण, तंत्रज्ञान सहकार्याला चालना
भारत–ऑस्ट्रिया द्विपक्षीय शिखर परिषद संपन्न; संरक्षण, तंत्रज्ञान सहकार्याला चालना
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – येथे भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यात उच्चस्तरीय द्विपक्षीय शिखर परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत संरक्षण तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर उत्पादन, शाश्वत पायाभूत सुविधा आणि उच्च-तंत्रज्ञान सहकार्याला प्राधान्य देत दोन्ही देशांनी संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीचे नेतृत्व पंतप्रधान आणि ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सलर यांनी केले. बैठकीस परराष्ट्र मंत्री , वाणिज्य व उद्योग मंत्री , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित होत्या.
ऑस्ट्रियाचे चान्सलर स्टॉकर यांनी युरोपबाहेरील पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी भारताची निवड केल्याने दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित झाले. या वेळी व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष, हरित तंत्रज्ञान, शिक्षण व सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच लोक-ते-लोक संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भारत–ऑस्ट्रिया राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्षांच्या पार्श्वभूमीवर नव्या करारांच्या अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप निश्चित करण्यात आला. संरक्षण उत्पादनातील संयुक्त उपक्रम, तसेच भारतीय स्टार्टअप्सना युरोपियन बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
दोन्ही देशांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध कठोर भूमिका कायम ठेवण्याचा पुनरुच्चार केला. तसेच भारत–युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही नमूद करण्यात आले.
या परिषदेत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, नवोन्मेष, कौशल्य विकास आणि सायबर व सागरी सुरक्षेसह एकूण १५ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत–ऑस्ट्रिया भागीदारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत