खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन एस एस सीत यश
![]() |
| रजत जैन |
खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन एस एस सीत यश
लेवाजगत न्यूज जळगाव — आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतांना आपली खेळाची आवड जोपासत नुकत्याच सीबीएसई बोर्डातर्फे जाहिर झालेल्या एस एस सी निकालात जळगावच्या रजत जैन कोचरने ८० टक्के मिळवत यश प्राप्त केले आहे.
सेंट जोसेफ स्कुलचा रजत विदयार्थी असून त्याला क्रिकेटची देखिल आवड आहे. यामूळे अनेक स्पर्धा व सरावामूळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. आईवडीलांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने खेळावर बंधन येत आहे असे लक्षात आल्याने पालकांना आश्वस्त करीत ८० टक्क्याच्यावर मार्क आणेल असे सांगून अवघ्या १० दिवसात त्याने एसएससीचा अभ्यास करत ८० टक्के मिळवले. रजत हा उदयोजक तथा होंडा कटटा मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जैन कोचर यांचा मुलगा असून जैन समाजात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत