Contact Banner

जळगाव विमानतळावर आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन; भूसंपादन चौकशी व २०० कोटींच्या रस्ते निधीची मागणी

 

jalgaon-airport-mla-suresh-bhole-rajmama-submission-cm-land-acquisition-inquiry-200-crore-road-fund-demand


जळगाव विमानतळावर आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन; भूसंपादन चौकशी व २०० कोटींच्या रस्ते निधीची मागणी

लेवाजगत न्यूज जळगाव : जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे आगमन झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे उर्फ राजुमामा यांनी त्यांचे स्वागत करून जळगाव शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले.

या वेळी भूसंपादन प्रकरणांबाबत गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. जळगाव महानगरपालिकेतील विविध भूसंपादन प्रकरणांमध्ये प्रशासकीय त्रुटी आणि चुकीच्या मूल्यांकनामुळे शासनावर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. विशेषतः मौजे जळगाव व मेहरूण परिसरातील काही संशयास्पद प्रकरणांची उच्चस्तरीय समिती किंवा विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये जमीनमालकांना योग्य व न्याय्य मोबदला मिळावा, मात्र सार्वजनिक निधीचा अपव्यय टाळण्यासाठी मोबदल्यावर वाजवी मर्यादा असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच चौकशीअंती संबंधित प्रकरणे पात्र ठरल्यास जमीनमालकांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.

तसेच जळगाव शहरातील वाढता विस्तार आणि वाढती वाहतूक लक्षात घेता रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करण्यात आली. यामध्ये रस्ते दुरुस्ती, मजबुतीकरण व काँक्रीटीकरणासाठी निधीची आवश्यकता असून, यापूर्वी सादर केलेल्या १०० कोटी व ७२ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री यांनी या दोन्ही विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.