Contact Banner

जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत १२ संधी उपलब्ध

 

jalgaon-jilhyat-pradhanmantri-internship-yojaneantargat-12-sandhi-upalabdh

जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत १२ संधी उपलब्ध


लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 2— : केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या १२ संधी उपलब्ध झाल्या आहेत. या योजनेअंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन तसेच रुजू झाल्यानंतर ६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.


जिल्ह्यात सध्या भारत पेट्रोलियम, डाबर इंडिया लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध असून दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव (दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९०) येथे संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.