रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली महादेव हॉस्पीलच्या तज्ञांनी घेतली शपथ, स्व. गोदावरी आजींना अभिवादन
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
महादेव हॉस्पीलच्या तज्ञांनी घेतली शपथ, स्व. गोदावरी आजींना अभिवादन
लेवाजगत न्यूज जळगाव : ज्या मातेच्या प्रेरणेतून भव्य वैद्यकिय सुविधा जळगावला उपलब्ध करून दिल्या जात आहे त्या गोदावरी आजींच्या सेवा का अभियानाचा आदर्श डोळयासमोर ठेवून रूग्णांची सेवा करण्याची शपथ महादेव हॉस्पीटलच्या तज्ञांनी घेत आदरांजली वाहीली.यावेळी स्व. गोदावरी आजींच्या कार्याला उजाळा देतांना अनेक तज्ञांनी त्याचेबाबत अनुभव विषद केला.
यावेळी गोदावरी फॉउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ. जयेश पाटील, डॉ.कमलेश तायडे, डॉ. भरत बोरोले, डॉ. सुनील पाटील, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. प्रतिक कपाटे, श्री. सुभाषदादा पाटील, डॉ. अभय जोशी, डॉ. विनोद बाविस्कर, प्रो. एन. जी. चौधरी, प्रो. विजय चौधरी, चिन्मय चौधरी, मोक्षदा वाघ, रोहित जावळे, वंदना पाटील, विनिता रस्तोगी इतर सहकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत