Contact Banner

जळगावहून आता इंदूरसह दिल्लीसाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा

 

jalgaon-to-indore-delhi-flights-3-days-weekly-air-service-start

जळगावहून आता इंदूरसह दिल्लीसाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. २५: जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता जळगावहून इंदूर मार्गे दिल्लीसाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू झाली आहे. एअर अलायन्स कंपनीतर्फे २ मेपासून ही सेवा सुरू होत असून, त्यामुळे जळगाव शहराची हवाई कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे.

या नव्या विमानसेवेच्या सुरूवातीमुळे जळगावचे थेट जोडणं मध्यप्रदेश आणि देशाची राजधानी दिल्लीशी झाले आहे. यापूर्वी जळगावहून आंध्रप्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांशी हवाई सेवा उपलब्ध होती. आता त्यात मध्यप्रदेश आणि दिल्लीचा समावेश झाल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

असे आहे वेळापत्रक :

  • दिल्लीहून उड्डाण : सायं. ४.४० वा.
  • इंदूरला आगमन : सुमारे ४५ मिनिटांत
  • जळगावला आगमन : सायं. ७.५५ वा.
  • जळगावहून परतीचे उड्डाण : रात्री ८.२० वा.
  • दिल्लीला पोहोचण्याची वेळ : रात्री ११.२० वा.

ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नियमित सुरू राहणार आहे.

दरम्यान, मुंबई विमानतळावर स्लॉट मिळण्यातील अडचणींमुळे काही वेळा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मात्र जळगाव-इंदूर-Delhi या मार्गामुळे मुंबई वगळून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.