जागृतीअभावी त्वचादानात तुटवडा; ‘नॅशनल बर्न्स सेंटर’चे नागरिकांना आवाहन
जागृतीअभावी त्वचादानात तुटवडा; ‘नॅशनल बर्न्स सेंटर’चे नागरिकांना आवाहन
उरण : सुनिल ठाकूर-(NBC) ने देशभरात त्वचादानाच्या गंभीर तुटवड्याबाबत तीव्र चिंता व्यक्त करत अधिकाधिक नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे संचालक व प्लास्टिक सर्जन यांनी सांगितले की, त्वचादानाविषयी पुरेशी जागृती नसणे हेच या कमतरतेचे मुख्य कारण आहे.
मुंबईतील ‘स्किन बँक्स’ना दरमहा आवश्यक असलेल्या त्वचेपैकी केवळ सुमारे २५ टक्केच दान मिळते. परिणामी, भाजलेल्या रुग्णांसाठी आवश्यक असलेली त्वचारोपण (स्किन ट्रान्सप्लांटेशन) सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाही.
तज्ज्ञांच्या मते, भाजलेल्या रुग्णांपैकी सुमारे ७० टक्के रुग्ण १५ ते ३५ वयोगटातील असतात. उपचाराच्या निर्णायक टप्प्यावर त्वचेचे रोपण उपलब्ध झाल्यास गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र या सुविधेअभावी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढतो.
डॉ. केसवानी यांनी सांगितले की, मृत्यूनंतर ६ तासांच्या आत त्वचेचे दान करता येते, परंतु त्यासाठी व्यक्तीची स्थानिक ‘स्किन बँक’मध्ये पूर्वनोंदणी आवश्यक असते. “दर दहापैकी कदाचित एकाच व्यक्तीला त्वचादानाची माहिती असते. जागृतीअभावी अनेक रुग्णांना आवश्यक उपचार मिळू शकत नाहीत, ही चिंतेची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.
भाजल्याच्या अपघातातून बचावलेले विराज ठाकूर यांनीही आपला अनुभव सांगताना, “४३ टक्के भाजल्यानंतर माझे आयुष्य त्वचारोपणावर अवलंबून होते. त्वचादानामुळेच मला नवे जीवन मिळाले,” असे भावनिक शब्दांत सांगत नागरिकांना त्वचादानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
दरम्यान, NBC दरवर्षी सुमारे ३०० जनजागृती कार्यक्रम राबवत असून या मोहिमेला , तसेच , यांसह विविध संस्थांचा पाठिंबा मिळत आहे.
संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्वचादानाबाबत जागरूक व्हावे, नोंदणी करावी आणि गरजूंना जीवनदान देण्यासाठी पुढे यावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत