Contact Banner

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

krantisurya-mahatma-jyotiba-phule-jayanti-nimit-dr-ulhas-patil-vaidkiya-sansthet-abhivadan


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

लेवाजगत न्यूज जळगाव – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन व स्मरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पूजा गेरे, डॉ. वैभव पाटील, डॉ. रश्मी संघवी, डॉ. तेजस सोनवणे, डॉ. ऐश्वर्या चलवडे, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. ऋषीकेश साखरे, डॉ. रुचा गौर, डॉ. साक्षी पटवारी, डॉ. दीक्षा मुंडे, डॉ. सिद्धी संखे तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. समाजातील अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी समाजात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला होता.

कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचे फुले यांचे विचार आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.