विश्वशांती समूह आयोजित चैत्र महोत्त्सव भव्य प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद आज समारोप
विश्वशांती समूह आयोजित चैत्र महोत्त्सव भव्य प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद आज समारोप
प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मानसी जोशी कडून मार्गदर्शन
लेवाजगत न्यूज जळगाव : विश्वशांती समूहाच्या वतीने चैत्र महोत्सव २०२६ निमित्त दोन दिवसीय भव्य प्रदर्शन व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. ११ व १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत लेवा बोर्डिंग हॉल येथे, नंदिनीबाई शाळेजवळ आयोजित करण्यात आला असून नागरिकांना खरेदीसोबत आनंददायी उत्सवाचा अनुभव व प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मानसीस् रॉयल लुक ब्युटी पार्लरच्या मानसी जोशी कडून मार्गदर्शन घेतले.आज समारोप करण्यात येइल
दरवर्षी या मेळाव्यात एकाच छताखाली विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी उत्तम संधी मिळते. मेळाव्यात ज्वेलरी, कपडे, वाळवणी पदार्थ, पापड-लोणचे, शुद्ध तेल व तूप, पर्स, क्रिस्टल्स, कॉस्मेटिक्स यांसारख्या विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येणार . घरगुती पदार्थांपासून ते फॅशन व लाइफस्टाइल उत्पादनांपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध असतील.या मेळाव्याचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे ब्युटी पार्लर सेवा ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा मेळावा विशेष आकर्षण ठरणार आहे. विविध स्टॉल्सवर उत्तम दर्जाच्या वस्तू आकर्षक व परवडणार्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.चैत्र महिन्याच्या उत्सवी वातावरणात कुटुंबासोबत खरेदी, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि आनंददायी वेळ घालवण्यासाठी हा मेळावा उत्तम ठरणार आहे. आयोजकांच्या वतीने मेळाव्यात फॅमिली फ्रेंडली वातावरण तयार करण्यात येणार असून सर्व वयोगटातील नागरिकांना येथे आनंददायी अनुभव मिळेल, असे सांगण्यात आले.नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत या चैत्र महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन विश्वशांती समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत