लेवा भवनात विद्यार्थी संघटनेचा कार्यक्रम; तनिष नेहेते यांची शहरप्रमुखपदी निवड
लेवा भवनात विद्यार्थी संघटनेचा कार्यक्रम; तनिष नेहेते यांची शहरप्रमुखपदी निवड
नाशिक : आज रोजी लेवा भवन, सातपुडा विकास मंडळ, नाशिक येथे विद्यार्थी संघटनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडूदादा) भोळे व केंद्रीय अध्यक्ष प्रकाश दादा पाटील यांच्या आदेशानुसार, जिल्हाप्रमुख नाशिक तुषार खाचणे यांच्या अध्यक्षतेखाली तनिष अनिल नेहेते यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या शहरप्रमुख पदावर निवड करण्यात आली.
यावेळी सातपुडा लेवा विकास मंडळाचे अध्यक्ष सुनील दादा पाटील, बाळकृष्ण अत्तरदे, तुषारदादा पाटील तसेच उपस्थित मान्यवर व मित्रपरिवाराने तनिष नेहेते यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत