लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी; जळगावात संतापजनक प्रकार
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी; जळगावात संतापजनक प्रकार
वृत्तसंस्था जळगाव:महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या “लाडकी बहीण” योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली महिलांकडून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
जळगावात घडलेल्या या संतापजनक प्रकरणात आरोपी रमेश चव्हाण याने योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरी जाऊन ई-केवायसी करून देण्याच्या बदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. या विकृत मागणीमुळे घाबरून न जाता संबंधित महिलेने तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान आरोपीने आणखी एका महिलेशीही अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्याकडेही शरीरसुखाची मागणी केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय योजनांच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरोधात परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत