Contact Banner

लेवा भ्रातृमंडळातर्फे जळगाव व मलकापूर येथे भव्य जॉब फेअरचे आयोजन

 

लेवा भ्रातृमंडळातर्फे जळगाव व मलकापूर येथे भव्य जॉब फेअरचे आयोजन

लेवा भ्रातृमंडळातर्फे जळगाव व मलकापूर येथे भव्य जॉब फेअरचे आयोजन

लेवाजगत न्यूज जळगाव : परिसरातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर यांच्या तर्फे जळगाव आणि मलकापूर येथे भव्य जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या जॉब फेअरमध्ये इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांपासून उच्च शिक्षित युवक-युवतींपर्यंत, फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांसाठी संधी उपलब्ध असणार आहेत. अकुशल व कुशल कामगार, तांत्रिक कर्मचारी, सॉफ्टवेअर इंजिनिअर्स यांच्यासह विविध क्षेत्रांतील उमेदवारांसाठी लघुउद्योगांपासून मल्टीनॅशनल कंपन्यांपर्यंत १००० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

इच्छुक आणि गरजू तरुणांनी आपला लेखी अर्ज, बायोडाटा तसेच आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सोमवार, दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज, जळगाव येथे जॉब फेअर आयोजित करण्यात आला आहे. तसेच मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मलकापूर येथेही जॉब फेअर होणार आहे.

या उपक्रमामुळे परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.