Contact Banner

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

 

mahadbti-certified-seeds-distribution-online-application-invite-farmers-benefit

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन


लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 30- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिक या घटकांची अंमलबजावणी महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. 


त्याअनुषंगाने अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक हे घटक महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविले जातात. सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक या घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विंडो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावेत.


राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता सन २०२६-२७ अंतर्गत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व अभियान कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी सुधारीत वाणांचे दर्जेदार बियाणे पुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे.


जास्तीत जास्त शेतक-यांनी या प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक या घटकांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या उपविभागीय कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.