मंदिर संस्कृती व परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा गुरव समाज घडला पाहिजे –": विजयकुमार हरिश्चंद्रे!"
मंदिर संस्कृती व परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा गुरव समाज घडला पाहिजे –": विजयकुमार हरिश्चंद्रे!"
उरण :सुनिल ठाकूर – नव्या आधुनिक युगात वावरताना मंदिर संस्कृती आणि परंपरा अबाधित ठेवायच्या असतील, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीशी त्यांचा संगम साधणे अत्यावश्यक आहे. मंदिरांच्या शेकडो वर्षांच्या परंपरा, प्राचीन ग्रंथ, तंत्र-मंत्र आणि संस्कार यांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी आजचा गुरव युवा समाज सज्ज झाला पाहिजे, अशी भूमिका दिगदर्शक पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी मांडली.
दौंड तालुक्यातील बोरमलनाथ येथे आयोजित राज्यस्तरीय गुरव संमेलनात विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. या संमेलनास राज्यभरातून लक्षणीय प्रतिसाद मिळाला. समाजाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन गुरव समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रांवर सखोल चर्चा झाली.
मंदिरांशी गुरव समाजाचे असलेले श्रद्धा, नाते आणि निष्ठा अबाधित राहण्यासाठी शेकडो गुरव पुजारी, संघटक आणि प्रतिनिधींनी सहकुटुंब उपस्थित राहून दैनंदिन संस्कार, धार्मिक विधी आणि आधुनिक शिक्षण यांमध्ये समतोल राखण्याची शपथ घेतली.
या वेळी गुरव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संमेलन संकल्पक नवल शेवाळे, बोरमलनाथ ट्रस्टचे अध्यक्ष कैलासआबा शेलार, मंदिर अभ्यासक पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे,इनाम-वतन गुलामगिरी अभ्यासक डॉ. नितीन ढेपे, भीमाशंकर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, देवस्थान महसूल कायदे तज्ज्ञ रवींद्र क्षीरसागर, ज्योतिषतज्ज्ञ प्रवीण राजगुरू, प्रभाकर आचार्य, अखिल महाराष्ट्र गुरव अध्यक्ष विजय क्षीरसागर, मॉडीलिपी तज्ज्ञ अॅड. रिद्धी गुरव, मंदिर महासंघ अध्यक्ष सुनील घनवट, सदानंद बारभाई, पराग गोखले, अशोक मोरे, गणेश पोरेगुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘मंदिर संस्कृती, ऐतिहासिक इनाम जमिनी आणि कायदे’ या विषयावर रवींद्र क्षीरसागर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘मोडी लिपी आणि इतिहास शिक्षण’ या विषयावर अॅड. रिद्धी गुरव यांनी विशेष समालोचन केले. तर ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि मंदिर संस्कृती – आज, काल आणि उद्या’ या विषयावर पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
विविध जिल्ह्यांतून आलेल्या गुरव समाजाच्या संघटक प्रतिनिधींचा सत्कार रवींद्र गुरव यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आबा शेलार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत