रेवा कुटीमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात ४४१ हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन
रेवा कुटीमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात
४४१ हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन
लेवाजगत न्यूज वरणगाव : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित रेवा कुटी, वरणगाव येथे वासुदेव परिवाराच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमांनी हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ वाजता गणेश आराधना व प्रभू श्रीराम स्तुतीने झाली. त्यानंतर हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओवीचे सामूहिक संगीतमय पठण करण्यात आले. यावेळी प्रत्येक ११ चालीसांच्या गटानुसार एकूण ४४१ हनुमान चालीसा पाठ संपन्न झाले. त्याचबरोबर प्रत्येक ओवीसह हवन करण्यात येत एकूण १६,८८० आहुती अर्पण करण्यात आल्या.
या प्रसंगी तुकाराम पाटील, वैशाली पाटील, पेचिमुत्थु नाडर, सिल्वराणी नाडार, डॉ. रविंद्र माळी, विवेक पाटील, सुलोचना पाटील, डॉ. रेणुका पाटील, दीपक फेगडे, मनोज गोसावी, उमेश माळी, कमलेश येवले, कुणाल शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत बढे, बाळकृष्ण चव्हाण, दिनकर पाटील, प्रकाश पाटील, सुचिता येवले, सुनंदा येवले, प्रतीक बोरणारे, श्लोक बोरणारे, आशिष येवले, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, गौरी येवले, सतीश जंगले, राहुल माळी, सुनीता चौधरी, चेतन झोपे, आकाश भंगाळे, सारंग जोशी, अनिकेत चव्हाण यांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. आभार प्रदर्शन दीपक फेगडे यांनी केले.
राम सेतू दगडाचे आकर्षण
हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांसाठी प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ‘राम सेतू’ दगड दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हा दगड पाण्यात तरंगत असल्याने भाविकांमध्ये विशेष आकर्षण ठरला. या तीर्थाचे प्राशन करून भाविकांनी समाधान व्यक्त केले. अशी माहिती कमलेश येवले यांनी दिली.
भाविकांचा उत्साह संजीवनीसारखा – राहुल माळी
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुरू केलेल्या संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाला वर्षपूर्ती झाली असून भाविकांचा वाढता प्रतिसाद आम्हाला संजीवनीसारखा वाटतो. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचे नियोजन असल्याचे राहुल माळी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत