Contact Banner

मुक्ताईनगर तालुक्यात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

muktainagar-newborn-baby-found-dead-kohala-shocking-incident


मुक्ताईनगर तालुक्यात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील कोहळा परिसरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःचे पाप लपवण्यासाठी किंवा अन्य कारणास्तव नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला शेतातील काटेरी झुडपात टाकून दिल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेत डोक्यावर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्या निष्पाप अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहळा गावच्या शिवारातील वामन अमृत धाडे यांच्या शेतातील बांधावर असलेल्या काटेरी झुडपात हे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली.

याप्रकरणी पोलीस पाटील श्रावण दशरथ भिल्ल यांनी फिर्याद दिली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.