Contact Banner

सावद्यातील आशा सुरेंद्र जावळे यांचे निधन; परिसरात हळहळ

 

savdyatil-asha-surendra-javale-yanchya-nidhan-parisarat-halhal


सावद्यातील आशा सुरेंद्र जावळे यांचे निधन; परिसरात हळहळ

लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) : येथील रहिवासी आशा सुरेंद्र जावळे (वय ६५ वर्षे) यांचे दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सावदा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्वभावाने अत्यंत प्रेमळ, जिव्हाळ्याच्या आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या म्हणून त्या परिचित होत्या. सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला.

त्यांच्या पश्चात मुलगा श्री. कुशल सुरेंद्र जावळे, सून सौ. विजया कुशल जावळे (नगरसेविका, नगर परिषद सावदा), दिर श्री. ब्रिजमोहन (बंडू) रामदास जावळे, मुलगी सौ. शुभांगी अतुल बोंडे तसेच अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या निधनाने जावळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.