Contact Banner

मुंबईत धक्कादायक घटना : बिर्याणी–कलिंगडानंतर खाल्ले एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

 

mumbai-food-poisoning-family-of-four-dead-after-biryani-watermelon

मुंबईत धक्कादायक घटना : बिर्याणी–कलिंगडानंतर खाल्ले एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

लेवाजगत न्यूज मुंबई  दक्षिण मुंबईतील परिसरात अन्नातून विषबाधेचा संशय असलेली अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिर्याणीची मेजवाणी आणि त्यानंतर खाल्लेल्या कलिंगडामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री अब्दुल्ला कादर (४०), पत्नी नसरीन (३५), मुली आयेशा (१६) आणि झैनब (१३) हे नातेवाईकांसोबत बिर्याणी पार्टीसाठी एकत्र आले होते. जेवणानंतर ते घरी परतले. रात्री उशिरा त्यांनी गोड म्हणून कलिंगड खाल्ले. मात्र पहाटेपासूनच सर्वांना उलट्या, अतिसार आणि अशक्तपणा जाणवू लागला.

प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सकाळी झैनबचा मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशा यांचाही मृत्यू झाला. रात्री उशिरा अब्दुल्ला यांनीही प्राण गमावले. अवघ्या १२ तासांत चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

काय आहे संशय?

प्राथमिक माहितीनुसार अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिर्याणी की कलिंगड—यापैकी नेमके कोणते कारण ठरले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घरातून अर्धवट खाल्लेले कलिंगड जप्त करून तपासासाठी पाठवले आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मते, कलिंगडासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांमध्ये भेसळ किंवा जिवाणूंची वाढ झाली तर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः साल्मोनेला किंवा लिस्टेरिया सारख्या जीवाणूंमुळे तीव्र अन्नविषबाधा होऊन डीहायड्रेशन, शॉक आणि मृत्यूही संभवतो.

तपास सुरू

मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आणि रासायनिक विश्लेषणाची प्रतीक्षा आहे. अन्न व औषध प्रशासन आणि फॉरेन्सिक विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत. बिर्याणीचे नमुने, कलिंगड आणि व्हिसेरा तपासल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.