राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला जळगाव येथे तासिका तत्वावर निदेशक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला जळगाव येथे तासिका तत्वावर निदेशक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज जळगाव– राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला जळगाव (राष्ट्रीय महामार्ग क्र. 6, जिल्हा उद्योग केंद्राजवळ) येथे विविध विषयांसाठी तासिका तत्वावर निदेशक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक १ पद व त्याकरिता संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा/आयटीआय (NCVT) पात्रता आवश्यक आहे. तसेच एम्प्लॉयबिलिटी स्किल्स पदा करिता एमबीए/बीबीए/बीसीऐ पात्रता आवश्यक आहे.
ही पदे तासिका तत्वावर भरण्यात येणार असून, इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २४ एप्रिल २०२६ पर्यंत संस्थेत प्रत्यक्ष सादर करावेत.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत