सावदा ‘ब्राम्हण हितवर्धिनी समिती’च्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरी
सावदा ‘ब्राम्हण हितवर्धिनी समिती’च्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरी
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : -सावदा येथील ‘ब्राम्हण हितवर्धिनी समिती’च्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील श्री गचके यांच्या दत्त मंदिरात करण्यात आले होते. भगवान परशुराम हे भगवान श्रीविष्णूंचे सहावे अवतार मानले जातात. कार्यक्रमाची सुरुवात परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर मंदिरात विधिवत पूजा-अर्चा आणि आरती संपन्न झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान परशुराम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. "भगवान परशुराम हे केवळ शस्त्रधारी नव्हते, तर ते वेद-पुराणांचे जाणकार आणि न्यायाचे पुरस्कर्ते होते. समाजात शिस्त, नीतिमत्ता आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांचा आदर्श आजही मार्गदर्शक आहे," असे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष सचिन सकळकले यांच्या वतीने करण्यात आले. श्री गचके यांच्या दत्त मंदिरातील या कार्यक्रमामुळे परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्राम्हण हितवर्धिनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. जयंती सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच जळगाव येथून प्रकाशित होणारे अजय डोहळे संपादित ब्रह्मदंड या मासिकाच्या भगवान परशुराम जन्मोत्सव विशेष अंकाचे भ. परशुराम जन्मोत्सवाच्या पावन वेळी सावदा ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे अध्यक्ष सचिन सकळकळे व सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले.
कार्यक्रमा दरम्यान सावदा येथील ट्रेन्स लाईव्ह'चे प्रतिनिधी जितेंद्र कुळकर्णी यांचा नुकताच जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. जितेंद्र कुळकर्णी यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमीच समाजातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या या कामाची दखल जिल्हास्तरावर घेतली जाणे, हे अभिमानाची गोष्ट आहे." त्यामुळे या गौरवपूर्ण यशाबद्दल समितीच्या वतीने सुद्धा आज त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत