Contact Banner

सेवानिवृत्त शिक्षक काशीनाथ टोके यांचे निधन

 

sevanivrutt-shikshak-kashinath-toke-yanchya-nidhan

सेवानिवृत्त शिक्षक  काशीनाथ टोके यांचे निधन

सावदा (ता. रावेर) : तालुक्यातील चिनावल येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक काशीनाथ बुधो टोके (वय ८६) यांचे आज (दि. १६) पहाटे भुसावळ येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता भुसावळ येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.

ते संजय टोके, प्रदीप टोके तसेच ‘सकाळ’चे चिनावल येथील बातमीदार मिलिंद टोके यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.