Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुटकॅम्प मध्ये सहभाग

godavari-abhiyantriki-mahavidyalay-vidyarthyacha-rashtriya-staravar-ide-bootcamp-sahabhag


गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुटकॅम्प मध्ये सहभाग

जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) - जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन डिझाईन अँन्ड इन्टरप्रिनरशिप (आयडीइ) आयडीई बुटकॅम्प एडीशन ३ मध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे.

हा बूटकॅम्प ऑल इंडीया काँन्सील फॉर टेक्नीकल एज्युकेशन मिनिस्टरी ऑफ एज्युकेशन इन्होव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, डिझाईन थिंकिंग आणि उद्योजकतेची जाणीव विकसित करण्यासाठी  दिनांक ०६ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ दरम्यान सोलापूर येथील एन. बी. नवले अभियांत्रिकी महाविद्यालय येथे हा पाच दिवसीय बूटकॅम्प पार पडला. देशभरातील निवडक विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थी यश अनिल चौधरी यांनी मयूर गुरव आणि दिपक काळे  आपल्या टीमसह या बूटकॅम्पमध्ये सहभाग घेतला. त्यांना प्रा. देवपाल यादव यांचे मार्गदर्शन लाभले.या बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना आयडिया व्हॅलिडेशन, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, तसेच प्रभावी पिचिंग स्किल्स याबाबत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला. हा बूटकॅम्प प्रामुख्याने प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण देणारा असून विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि नवोपक्रम क्षेत्रात मार्गदर्शन करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या सहभागामुळे विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर उद्योजकतेच्या दिशेनेही एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालयात नवोपक्रम व स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील ( आयआयसी अध्यक्ष), डॉ. हेमंत इंगळे (उपाध्यक्ष), डॉ. अतुल बर्‍हाटे (समन्वयक), तसेच शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा व इतर प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.