Contact Banner

उरणच्या चाणजेत खरातच्या पत्नीच्या नावे २० गुंठे जमीन ; प्रकरण उघडकीस आल्यानंतर व्यवहार रद्द केल्याची तहसीलदारांची माहीती

 उरणच्या चाणजेत खरातच्या पत्नीच्या नावे २० गुंठे जमीन ;


 प्रकरण उघडकीस आल्यानंतर व्यवहार रद्द केल्याची तहसीलदारांची माहीती


 उरण : सुनिल ठाकूर-                

भोंदूगिरी करून शेकडो महिलांचा लैंगिक छळ करणारी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्या नावे उरणच्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील वीस गुंठे जमीन असल्याचे उघड झाले आहे. या वीस गुंठे जमिनीचा बाजार भाव हा ३ कोटींच्या वर असून ती अवघ्या ५८ लाख ५० हजार रुपयात खरेदी केली असल्याचा दस्त करण्यात आला आहे. कल्पना खरात ही फरारी असतांना हा व्यवहार झाल्याने या व्यवहार बाबत शंका व्यक्त केली जात असून याची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

खरेदी खत करून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात जमीन खरेदी विक्रीत अडीच ते तीन कोटींचा व्यवहार झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या या भोंदू बाबाचे उरण कनेक्शन समोर आल्याने परिसरात मात्र उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या खरातची एसआयटीकडून चौकशीही सुरू आहे.या दरम्यान खरातची पत्नीही फरार झाली आहे.

अटकेत असलेल्या आणि एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अशोक खरात यांनी गैरमार्गाने कमावलेल्या पैशातून अनेक ठिकाणी जागा, जमिनी खरेदी केलेल्या आहेत. खरातनेही पत्नीच्या नावाने उरणमध्येही जमीन खरेदी केली आहे. पत्नी कल्पना अशोक कुमार खरात यांच्या नावावर खरातने उरण चाणजे महसूल हद्दीतील सर्व्हे नं. ३७१/३८ मध्ये २० गुंठे जमीन ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. या जमिनीच्या खरेदीच्या व्यवहाराची नोंदणी १२ मार्च २०२६ रोजी येथील दुय्यम निबंधक सहकारी कार्यालयात झाली आहे. त्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी तलाठी कार्यालयात या जमिनीच्या खरेदीची वर्दी नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली होती.

 त्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार मंजूरी आणि कल्पना खरात यांच्या नावाने सातबारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

मात्र चाणजे महसुली हद्दीतील अद्यावत करंजा मच्छीमार बंदर, कोकणशी जोडणारा करंजा - रेवस सागरी सेतू, रो-रो सेवा यामुळे या परिसरातील जागा जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत.

जमीन सिडकोच्या संपादनात समाविष्ट :


उरणच्या चाणजे परिसरातील जमीनी ही सिडकोच्या  भूसंपादनात आहे. येथील जमीनी खरेदी करून ती सिडकोला साडेबावीस टक्केसाठी वर्ग केल्यास उलव्यात मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे विकसित भूखंड देण्यात येत आहेत. याचा लाभ अनेक राजकीय नेते व शासकीय उच्चपदस्थ यांनी घेतला यामधून शेतकऱ्यांकडून लाखात विकत

 खरेदी खत करून ती सिडकोला साडेबावीस टक्केसाठी वर्ग केल्यास उलव्यात मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे विकसित भूखंड देण्यात येत आहेत. याचा लाभ अनेक राजकीय नेते व शासकीय उच्चपदस्थ यांनी घेतला यामधून शेतकऱ्यांकडून लाखात विकत घेतलेल्या जमीनीना कोट्यवधी रुपये कमावले जात आहेत. त्यामुळे या जमीन खरेदीला महत्व आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.