Contact Banner

भुसावळ नगराध्यक्षांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीचा मोठा निर्णय

 

भुसावळ नगराध्यक्षांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीचा मोठा निर्णय


लेवाजगत न्यूज भुसावळ : भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय समोर आला आहे. जळगाव येथील जात पडताळणी समितीने त्यांच्या प्रमाणपत्राला अवैध ठरवले असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नियमानुसार निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला आहे.

भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. या निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत एस.सी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र जोडले होते.

दरम्यान, प्रमोद सावकारे, रजनी संजय सावकारे, संजय तायडे आणि राहुल तायडे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रांताधिकाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे गायत्री भंगाळे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता असून पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.