आरोहण २०२६ उत्साहात संपन्न; क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला महोत्सव
आरोहण २०२६ उत्साहात संपन्न; क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला महोत्सव
लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोहण २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण महोत्सव जल्लोषमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून तसेच ‘आरोहण २०२६’ चे प्रतीकात्मक फलक प्रदर्शित करत करण्यात आले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगत वाढवली.
‘कुरुक्षेत्र’ अंतर्गत कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आदी सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ८ ते १० मे दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ११ मे रोजी ‘प्रॉम नाईट’ तर १२ मे रोजी ‘डीजे नाईट’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाचा दिमाखदार समारोप झाला.
समारोप प्रसंगी डॉ. हर्षल बोरोले, डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. पंकज शर्मा, विशाखा गणविर, डॉ. पियुष वाघ, डॉ. जयवंत नागुलकर व डॉ. विजय बाविस्कर यांच्यासह प्राध्यापक, अध्यापन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी गायन, वादन आणि नृत्य कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत