Contact Banner

भागपूर येथे ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार शोध अभियान’ राबविण्यास सुरुवात

 

bhagpur-zero-leprosy-transmission-search-campaign-launched

भागपूर येथे ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार शोध अभियान’ राबविण्यास सुरुवात

लेवाजगत न्यूज जळगाव-तालुक्यातील भागपूर, उमाळा व देव्हारी येथे आरोग्य विभागामार्फत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत असून, १५ मे ते १५ जून दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार शोध अभियान’ सुरू आहे.


bhagpur-zero-leprosy-transmission-search-campaign-launched


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, प्रा.आ.केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे आणि तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ अनिल नन्नवरे यांच्या सूचनेनुसार भागपूर परिसरात विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे.

यावेळी आरोग्य पथकाने भागपूर गावात घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी केली. पथकात आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, आरोग्य सेविका योगिता कोकाटे तसेच सीएचओ शिरीन पाटील यांचा सहभाग होता.

ग्रामस्थांना कुष्ठरोगाची लक्षणे, प्रतिबंधक उपाय आणि उपचारांविषयी माहिती देत जनजागृती करण्यात आली. मागील पाच वर्षांत एकही कुष्ठरुग्ण न आढळलेल्या गावांमध्ये विशेष सर्वेक्षण करून संभाव्य रुग्णांचा शोध घेतला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यास औषधोपचाराने आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो व त्याचा प्रसार रोखता येतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.