Contact Banner

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोईंग स्पर्धेत योगेश बोरोले याला रौप्यपदक

 

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोईंग स्पर्धेत योगेश बोरोले याला रौप्यपदक

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोईंग स्पर्धेत योगेश बोरोले याला रौप्यपदक

लेवाजगत न्यूज सावदा-रावेर तालुक्यातील विवरे येथील योगेश ललित बोरोले याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल चॅम्पियनशिप रोईंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावून तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

ही स्पर्धा चंदीगड येथे आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध विद्यापीठांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत योगेश बोरोले याने दमदार प्रदर्शन करत सिल्वर मेडल मिळवले.

योगेश सध्या पुणे येथे रोईंगचा सराव करत असून तेथील प्रशिक्षक व शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. कठोर मेहनत, नियमित सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

त्याच्या या यशामुळे विवरे गावासह रावेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

लेवा जगत न्यूज परिवार तसेच पाटील परिवारातर्फे योगेश बोरोले याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.