कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या बोगीला आग
कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या बोगीला आग
लेवाजगत न्यूज जळगाव : भुसावळहून कोळसा घेऊन येणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या बोगीला रविवारी सकाळी सुमारे ११.४० वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. ही घटना जळगाव रेल्वे पुलाजवळ तसेच नवीन तिकीट घर परिसरात घडल्याने परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक एस. एस. ठाकूर यांनी शिवाजीनगर अग्निशमन केंद्राला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या पाचव्या बोगीमधून धूर व आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या.
कोळशामधील उष्णता किंवा घर्षणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून रेल्वे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
अग्निशमन विभागाचे वाहन चालक किरण महाजन तसेच फायरमन शिवाजी तायडे आणि मनोज पाटील यांनी तत्परता दाखवत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत