Contact Banner

को .म .सा तर्फे हरिश्चंद्र म्हात्रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 

harishchandra-mhatre-honoured-with-jeevan-gaurav-award-by-komsa


को .म .सा तर्फे  हरिश्चंद्र म्हात्रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी पाले( अरुण म्हात्रे)जीवन जगताना चंदनासारखे असावे जे स्वतः झीजून इतरांना सुगंध द्यावा तसेच वृक्षांप्रमाणे असावे जे स्वतः उन्हाचे चटके सहन करून  वाटसरूना छाया देणारे असावे अशाच प्रकारे समाजात काही माणसं असतात ती स्वतः कष्ट करून इतरांना आनंद देत असतात मग ते सामाजिक असो शैक्षणिक असो अथवा दुसऱ्याचे ऋणानुबंध फेडणारे असो त्यापैकीच पालेगावचे हरिश्चंद्र म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र म्हात्रे यांना मधुबन कट्टा ,तसेच कोमसा उरण तर्फे जिवन  गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. पाले गावातील सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र म्हात्रे हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.अनेक संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य जोमाने करत आहेत. यामध्ये सफाई अभियान, गडकिल्ले सफाई, विविध स्पर्धा, वृक्षलागवड, त्याच संगोपन, अदिवासी बांधवांना कपडे वाटप, खाऊ वाटप, दिवाळी फराळ फटाके वाटप अदिवासी शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, वॉटर प्युरीफायर जार वाटप,ग्राम स्वच्छता अभियान रायगड जिल्ह्या परिषदेच्या शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप ,पाणी आडवा पाणी जिरवा अशा विविध उपक्रमात त्यांनी  हिरीरीने  भाग घेतला आहे. त्याचं बरोबररस्ते सफाई, पिरकोन, सारडे, वशेणी ,पाणदिवे रस्त्यावरील खडी,रेती माती सफाई करून बाईक स्वारांना अपघातासा पासून मुक्ती देण्याचं काम केल जात आहे. ज्या समाजात आपण जन्मलो त्याचे ऋण फेडण्याच काम ते करत आहेत, हे सर्व समाजहिताचं त्यांचं कार्य पाहता मधुबन कट्टा तसेच कोमसा उरण तर्फे त्यांना आज जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     या वेळी संस्थेचे रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, रामचंद्र म्हात्रे मच्छिंद्रनाथ म्हात्रे, संजय होळकर, रंजना केणी, समता ठाकूर, संजीव पाटील, अजय शिवकर, अनिल भोईर, नरेश पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, हेमंत पाटील, दौलत पाटील,रमण पंडीत, शिवप्रसाद पंडीत,,अनामिका राम, समवेत संजीवनी म्हात्रे, संतोष जोशी, प्रकाश म्हात्रे, निखिल म्हात्रे, श्रुती म्हात्रे, अरुण म्हात्रे, कामेश्वर म्हात्रे,अविनाश म्हात्रे सई म्हात्रे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.